बर्याच दिवसांनी शेजारच्या मल्टीप्लेक्समधे मराठी सिनेमा लागला होता. महत्वाची गोष्ट म्हणजे वेळेवर सिनेमा दाखवला गेला. नाहीतर अनुभव असा असतो की सगळी कामं आटपून चित्रगृहात जावं तर प्रेक्षक नसल्यामुळे शो रद्द करण्यात येतो. पण या वेळेला तसं झालं नाही. बघताबघता दहापंधरा लोक जमले व तिकीट देऊन त्या लोकांना खरोखर प्रेक्षागृहात “दाखला” मिळाला. मंडळी, हा लेख त्या