Posts Tagged ‘हिन्दू-मुस्लीम एकता’

सर्वधर्म ‘सण’भाव

दिवाळी सण हिंदूंचा असं म्हटलं, तरी भेंडीबाजारातील मुस्लिम बांधवांचा फटाक्याच्या निमित्ताने यातील सहभाग मानला तर ‘सर्वधर्म ‘सण’ भाव’ असंच म्हणावं लागेल. काल-परवापासून घराघरातील फराळाचे डबे फस्त होण्यास सुरुवात झाली असेल. सर्वाच्या आवडीचा सण साजरा होतोय. आपल्या धकाधकीच्या जीवनात दिवाळीला असणारं महत्त्व आणि स्थान कुणाला वेगळं सांगण्याची गरज नाही. लोकांना अगदी मनापासून वाट पाहायला लावणारा हा