कविता

Page 1 of 41234

सागरा प्राण तळमळला – स्वातंत्र्यवीर सावरकर

सागरा प्राण तळमळला – स्वातंत्र्यवीर सावरकर

ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला ॥धृ॥ भूमातेच्या चरणतला तुज धूता मी नित्य पाहिला होता मज वदलासी अन्य देशि चल जाऊ सृष्टिची विविधता पाहू तैं जननीहृद् विरहशंकितहि झाले परि तुवां वचन तिज दिधले मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन त्वरित या परत आणीन विश्वसलो या तव वचनी मी जगद्नुभवयोगे बनुनी मी तव अधिक शक्ती

मराठी माणसाचं बेवारस प्रेत …

कोणे एके काळी म्हणे मुंबईत मराठी माणूस होता. मुंबईत त्याचा बोलबाला होता. मोडेन पण वाकणार नाही अशी होती त्याची ख्याती नसानसांत भिनलेली त्याच्या रग मराठी मातीची दादर परळ गिरगाव वस्ती त्याची भाऊचा धक्का … करारी होता पण दादा वायच्याचा पक्का … हळू हळू वस्ती लागलीया वाढू मजल्यावरी मजले लागले चढू चाळीतली माणुसकी हरवुन गेली मराठी

असेल कुणीतरी…

असेल कुणीतरी, जी माझ्यासाठी देवाने बनवली असेल, असेल कुणीतरी, जी माझी वाट बघत असेल, असेल कुणीतरी, जी नेहमी माझाच विचार करत असेल, असेल कुणीतरी, जी स्वप्नात सुद्धा मलाच शोधत असेल, असेल कुणीतरी, जी चेहऱ्याने सुंदर नसली तरी मनाने सुंदर असेल, असेल कुणीतरी, जी थोडीशी नाजूक, थोडीशी भावूक आणि थोडीशी लेझी असेल, असेल कुणीतरी, जी चांद

नवर्या साठी न बायको साठी…

नवर्या साठी न बायको साठी…

तो तिला म्हणाला “डोळ्यात तुझ्या पाहू दे” ती म्हणाली “पोळि करपेल, थाम्ब जरा राहू दे” तो म्हणाला “काय बिघडेल स्वयंपाक नाही केला तर?” ती म्हणाली ” आई रागावतील, दूध उतू गेल तर?” “ठीक आहे मग दुपारी फिरून येवू, खाऊ भेळ” “पिल्लू येईल शाळेतून, पाणी यायची तीच वेळ” “बर मग संध्याकाळी आपण दोघेच पिक्चर ला जावू”

मी मालक फुटक्या कवड्यांचा

तडफड झाली होती तेव्हा साखर वेचून जळले कोण स्वर्गातून पडल्यावर कळले चूक कोणती, चळले कोण वीज घेवूनी कुठे चालली अंधाराची तान्ही पोर जागोजागी टपल्या वाटा घेऊनिया हाताशी चोर वादळ सरता क्षितीजालाही चैतन्याचा आला कोंब ठरले नव्हते आनंदाचे परिस्थितीची झाली बोंब उलट्या पूलट्या संसाराला शिवण घातली चंदेरी गूढ राहू दे तुझे वागणे अबोध असू दे कुणीतरी

Page 1 of 41234