सांप्रतकाळीचे ज्येष्ठ समालोचक आणि गतजन्मीचे कसोटीवीर रवी शास्त्री यांनी गोजिरवाण्या अजु आगरकरला भरमैदानात शंभर नंबरी सवाल टाकला – “पुणं कसं वाटलं?” भूमंडळ थबकले. आभाळाने कान टवकारले. शनवारवाड्याच्या बुरुजांमधोन एक उसासा वादळतेने धुमसत गेला! लक्ष्मी रोडचा ट्रँफिक जागच्या जागी गोठला. आसमंतात... (Continue reading)
- आप्त म्हंजे काय रे भाऊ? - अरे आप्त ही काही वस्तु नव्हे रे! आपापल्या तप्त तव्यावर पोळी भाजुन घेणारास ‘आप्त’ असे म्हणतात! - हां हां! म्हंजे हितचिंतक का रे भाऊ? - छे छे! हितचिंतक नावाची वस्तु वेगळीच असते! जे... (Continue reading)
माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आज सकाळी उठलो. तसा मी रोज त्यांच्याच आशीर्वादाने उठतो. पण मा.शि.बा.ठा. यांच्या आशीर्वादाने आज मी सदुसष्ट वर्षांचा झालो. अभीष्टचिंतनाचा वर्षाव होतो आहे. किती हे लोकांचे प्रेम! (मते द्यायला काय होते यांना?) सकाळीच मा.शि.बा.ठा. यांच्या... (Continue reading)
मी कात्रजचा साधासुधा रंग बिंग बदलणारा शामेलिआँन सरडा आहे. गेल्या आठवड्यात दोन नाकतोडे मटकावून शांतपणे बसलेलो असताना अचानक आमची उचलबांगडी झाली आणि इथे बाद्रयांत येऊन पडलो! इथे आल्यावर लगेचच कळलं, की आपण साक्षात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या घरात आहोत! (काही... (Continue reading)
- जय महाराष्ट्र.. साहेब! - जय महाराष्ट्र! तुम्ही कोण विद्वान? - तेच ते बुळबुळीत भेंडीची भाजीवाले! - भेंडीची भाजी! शी! थोडी आमसुले तरी घाला, म्हणावं! तार सुटणार नाही. - बरं बरं! - पटापट गरळ ओका आणि तोंड काळं करा! तुमच्यासारख्या... (Continue reading)
आम्ही – नमस्ते अमिताभजी…. येऊ का ‘जलशा’त? अमिताभजी – आँय? ये भी कोई पुछने की बात हुई? अमा आ जाओ यार! आँय! आम्ही – अभिनंदन! अमिताभजी – किस लिये? क्यु? का? व्हाय? आँय! आम्ही – तुम्ही शेतकरी झालात!! अमिताभजी –... (Continue reading)
प्रीय वैणी, येवल्याच्या लहानग्या कार्यकर्त्याचा शिसीष्टांग णमस्कार! तुमी सांगितल्याप्रमाणे सायेबान्ला घेऊन सुरक्शित सुरतला पोचलो. प्रवासात काही त्रास झाला नाही. (साहेबांनी धिला नाही! मोटे सायेब डब्यात असल्याने आपले साहेब नीट होते!) ‘हाँलिडे इन’ नावाच्या एका भारीतल्या भारी होटलमध्ये सायेबान्ला आनि इतर... (Continue reading)
डियर माँमा, गुजरातमधल्या करेली नावाच्या एका लाऊजी व्हिलेजमधुन मी तुला लिहित आहे. (हँन्डरिटन…फ्यू…!) माँमा, माँमा! व्हाय व्हाय यु डिड धिस टु मी? व्हाँटा हाँरिबल एक्सपिरियन्स! माझ्या पायाला चालुन चालुन फोड आले आहेत! खूप शँबी पाँडस मधुन चालत जावं लागलं.... (Continue reading)